BACK
HOME

अस्वच्छ व्यवसायातील पालकांच्या मुलांना मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती

• उद्दिष्ट:
अस्वच्छ व्यवसायात काम करणाऱ्या पालकांच्या मुलांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी व त्यांना समाज प्रवाहात आणणे कामी सदर शिष्यवृत्ती योजना लागू करण्यात आली आहे. या शिष्यवृत्ती योजनेमध्ये केंद्र सरकारने सुधारणा केलेल्या असून त्याची अंमलबजावणी दि. ०१/०४/२००८ पासून लागू करण्यात आलेली आहे.

•अटी व शर्ती :
१) अस्वच्छ व्यवसायात काम करणारे, अस्वच्छ व्यवसायाशी परंपरेने संबंधित सफाईगार, कातडी सोलणे, कातडी कमावणे या व्यवसायात गुंतलेल्या व्यक्तींच्या पाल्यांना अनुज्ञेय.
२) ही शिष्यवृत्ती सर्व जाती-धर्माला लागू आहे.
३) ही योजना केंद्र पुरस्कृत असून यासाठी कोणतीही उत्पन्नाची अट नाही.
४) अस्वच्छ व्यवसाय करणार्‍या व्यक्तींना ग्रामसेवक व सरपंच नगरपालिका मुख्याधिकारी महानगरपालिका आयुक्त / उपायुक्त प्रभाग अधिकारी यांच्याकडून अस्वच्छ व्यवसाय करीत असल्याबाबतचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
५) अनुसूचित जातीमध्ये समावेश केलेल्या पालकांच्या पाल्यांसाठी जातीचा दाखला.

•लाभाचे स्वरूप :
१) १ ली ते २ री च्या वसतिगृहात न राहणाऱ्या विद्यार्थांना रु. ११०/- दरमहा व तदर्थ अनुदान रु. ७५०/-
२) इ. ३ री ते १० वी वसतिगृहात न राहणारे विध्यार्थ्यांसाठी रु. ११०/- दरमहा व तदर्थ अनुदान रु. ७५०/- दरमहा
३) वसतिगृहात राहणाऱ्या इ ३री ते १० वी दरमहा रु. ७००व तदर्थ अनुदान रु. १०००/-

•संपर्क :
१ )संबधित शाळेचे मुख्याध्यापक
२) संबधित जिल्ह्याचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद.