अनुसूचित जातीच्या मुला-मुलींना परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती
• उद्दिष्ट:
अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील विद्यार्थ्यांना आर्थिक परिस्थितीमुळे उच्चशिक्षणासाठी परदेशातील नामांकित विद्यापीठांमध्ये प्रवेश घेता येत नाही. विद्यार्थ्यांची गुणवत्ता असूनही केवळ आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना उच्च शिक्षणापासून वंचित रहावे लागते. या विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणाची संधी मिळावी व त्यांच्या गुणवत्तेला वाव मिळावा म्हणून परदेशातील नामांकित विद्यापीठांमध्ये ज्या विद्यार्थ्यांना पदव्युतर व पी.एच.डी. अभ्यासक्रमाकरिता प्रवेश मिळाला आहे, अशा ५० विद्यार्थ्यांना (पी.एच.डी. २४ व पदव्युत्तर २६ प्रदेशातील शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्यात येते.
•अटी व शर्ती :
१. विद्यार्थी अनुसूचित जाती / नवबौद्ध घटकातील असावा.
२. विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
३. विद्यार्थ्यांचे वय पदवीत्तर पदवी अभ्यासक्रमाकरिता ३५ वर्षापेक्षा जास्त नसावे व Phd. अभ्यासक्रमाकरिता ४० वर्षापेक्षा जास्त नसावे.
४. विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रुपये ६.०० लाखापेक्षा जास्त नसावे.
५. विद्यार्थ्यांने QS rank३०० मधील विद्यापीठांमध्ये प्रवेश घेतलेला असावा.
•लाभाचे स्वरूप :
१. विद्यापीठाने प्रमाणित केलेली शिक्षण फी ची पूर्ण रक्कम व इतर खर्च मंजूर करण्यात येतो.
२. विद्यार्थ्यास वार्षिक निर्वाह भत्ता अमेरिका व इतर राष्ट्रांसाठी १४०० यु.एस.ए. डॉलर तर यु.के. साठी ९००० पौंड इतका अदा करण्यात येतो.
३. विद्यार्थ्याला आकस्मिक खर्चासाठी यु.एस.ए. व इतर देशांसाठी १३७५ यु.एस.डी. तर यू.के.साठी १०००पौंड इतके अर्थसाह्य देण्यात येतात. पुस्तके, अभ्यासदौरा इत्यादी खर्चाचा यात समावेश आहे.
४. विद्यार्थ्यांस प्रदेशात जाताना व अभ्यासक्रम झाल्यानंतर परत येताना विमान प्रवासाचा खर्च (Shortest Route Economy Class) तिकीट सादर केल्यानंतर मंजूर करण्यात येतो.
•संपर्क :
१. जाहिराती द्वारे दरवर्षी मे महिन्यात अर्ज मागविण्यात येतात.
२. आयुक्त, समाज कल्याण, महाराष्ट्र राज्य, पुणे