अनुसूचित जाती मुला-मुलीं करिता शासकीय निवासी शाळा
• उद्दिष्ट:
1. आर्थिक परिस्थितीमुळे अनुसूचित जातीच्या व नवबौद्ध मुला-मुलींना प्राथमिक व माध्यमिक शिक्षण घेता येत नाही. अशा मुला- मुलींच्या शिक्षणाची सोय व्हावी म्हणून प्रत्येक तालुक्यात एक शासकीय निवासी शाळा सुरु करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. ३५३ शासकीय निवासी शाळा पैकी प्रथम टप्प्यात १०० शासकीय निवासी शाळा सुरू करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे. त्यापैकी ८० निवासी शाळा सुरू आहेत.
2. निवासी शाळेमध्ये इयत्ता ६ वी ते १० वी पर्यंतच्या अनुसूचित जाती व नवबौद्ध मुला-मुलींना प्रवेश दिला जात आहे. जून २०११ पासून इयत्ता ५ वी ते ७ वीचे वर्ग सुरू करण्यात आले असून सन २०१२ ते २०१३ या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता ८ वी व त्यानंतर नैसर्गिक वर्गवारीनुसार इयत्ता ९ वी व १० वी चे वर्ग सुरू करण्यात येणार आहेत.
3. निवासी शाळेत मोफत भोजन , निवास , ग्रंथालयीन सुविधा व इतर आवश्यक शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
• निवासी शाळा:
1) नाव - अनुसूचित जाति व नवबौद्ध मुलींची शासकीय निवासी शाळा
पत्ता - वारेगांव,ता. कामठी, जि. नागपूरपो. बिना ता. कामठी जि.नागपूर
मुख्याध्यापक - श्री. विलास गायकवाड९४०३२०३०५८
2) नाव - अनुसूचित जाति व नवबौद्ध मुलींची शासकीय निवासीशाळा
पत्ता - वानाडोंगरी, ता. हिंगण, जि नागपूरप्रभाग क्र. ८,बाबडे सभागृहाच्या मागे, शासकीयआयटीआय जवळ, ता. वानाडोंगरी,जि.नागपूर
मुख्याध्यापक - श्रीमती दुशिला मेश्राम९४२०८४६४५
3) नाव - सफाई कामगारांच्या मुलां-मुलींची शासकीय निवासीशाळा
पत्ता - रमानगर,नागपूरसालासार वसाहत, कोहिनूर लॉनसमोर,वाठोडा रिंग रोड, नागपूर.
मुख्याध्यापक - श्री. रजनीकांत नंदनवार-९०४९१३६९००
• संपर्क
1. संबंधित जिल्ह्याचे, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण
2. संबंधित मुख्याध्यापक, शासकीय निवासी शाळा
3. संबंधित जिल्ह्याचे गट शिक्षणाधिकारी, पंचायत समिती
4. संबंधित जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी ( माध्यमिक ) , जिल्हा परिषद
5. संबधित विभागाचे प्रादेशिक उप्पायुक्त समाज कल्याण